मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास करू : प्रा. सावंत

Prof Shivaji Sawant will develop the district under the leadership of Chief Minister Eknath Shinde

करमाळा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी पदाधिकारी कटिबद्ध आहेत. आता पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सक्रिय व्हावे, असे आवाहन शिंदे समर्थक शिवसेनेचे नेते प्रा. शिवाजीराव सावंत यांनी केले आहे.

करमाळा येथील शिंदे समर्थक शिवसेनेच्या कार्यालयाला प्रा. सावंत यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, शहर प्रमुख संजय शीलवंत, उपशहर प्रमुख राजेंद्र काळे, नागेश गुरव, पिंटू गायकवाड, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, शेलगावचे सरपंच अंकुश जाधव, पांडे येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आप्पा आंधळकर, सुनील वायकर, महेश दिवाण, सचिन पांढरे, नागेश शेंडगे, संजय जगताप उपस्थित होते.

एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून करमाळ्यात नव्याने उभा होत असलेल्या स्वातंत्र्यसैनिक मनोहरपंत गणपत चिवटे ब्लड बँकेची प्रा. सावंत यांनी पाहणी केली. दरम्यान चिवटे यांनी लवकरच करमाळा शहरात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांच्या मदतीने व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत डायलिसिस सेंटर उभा करून किडनी पेशंटला मदत करण्याचा मनोदय व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *