करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पोथरे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. त्यानंतर गावांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. माजी ग्रामपंचायत सदस्य धनंजय काळे, पत्रकार नानासाहेब पठाडे यांच्यासह गावांतील युवक उपस्थित होते. यावेळी वारे यांनी मनोगत व्यक्त करताना सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.
