करमाळा (सोलापूर) : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या लोकनेते दिगंबरराव बागल मामा कृषी व औद्योगिक महोत्सवाच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन आज (बुधवारी) झाले. प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी मनोज राऊत, मुख्याधिकारी बालाजी लोंढे, साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर, उपसभापती चिंतामणी जगताप, आदिनाथचे अध्यक्ष धनंजय डोंगरे व विजयराव पवारउपस्थित होते. करमाळा तहसील कार्यालय येथे हे प्रकाशन झाले.
