करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस जानेवारीत भैरवनाथ व कमलाई कारखान्याने गाळपासाठी नेहला आहे. परंतु अजूनही या कारखान्यांनी शेतकय्रांना पहिलेच ऊसाचे बिल दिले नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकरी ऊस बिलाची वाट पाहून वैफल्य ग्रस्त होऊन आत्महत्या सारखा मार्ग स्वीकारेल. त्यास सर्वस्वी जबाबदार भैरवनाथ व कमलाई साखर कारखान्याचे चेरमन जबाबदार असतील याची नोंद घ्यावी. बील न मिळाल्यास बहुजन संघर्ष सेना तीव्र आंदोलन करणार आहे, असा इशारा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी दिला आहे.
जिल्हाध्यक्ष कदम म्हणाले, भैरवनाथ व कमलाई साखर कारखान्यांनी पंधरा दिवसांच्या आत शेतकय्रांची ऊसाची बिले द्यावीत अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
संपादन : अशोक मुरुमकर