Video : ‘करमाळ्याचा राजा’ समजल्या जाणाऱ्या मंडळाची सामाजिक बांधिलकी कायम! बाल मंडळाचाही पेठेत सीसीटीव्ही बसवण्याचा निर्धार

करमाळा (सोलापूर) शहरातील सर्वात मोठी आर्थिक उलाढाल होणारी पेठ म्हणजे राशीन पेठ! सर्वाधिक उलाढाल येथे होते. या पेठेत सर्व व्यापारी आहेत. याशिवाय चार हॉस्पिटल या पेठेत आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने या पेठेतील सर्व नागरिक एकत्र येतात. वर्षभर साधारण १२ उत्सव ते साजरा करतात. राजकीय क्षेत्रातही या पेठेतील मंडळी अग्रेसर आहे. मंडळाच्या कामात मात्र सर्व विसरून काम केले जाते. या मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख असलेले मंगेश चिवटे हे याच पेठेतील आहेत. याचा अभिमान येथील नागरिकांना आहे. ज्येष्ठानी जपलेली सामाजिक बांधिलकी बाल मंडळीही जपत आहे. याचा प्रत्यय त्यांच्या कामातून दिसत आहे. याचे कारण यावर्षीचा अनावश्यक खर्च टाळून त्यांनी पेठेच्या दोन्ही बाजूला सीसीटीव्ही लावण्याचा संकल्प केला आहे. याशिवाय परिसर स्वच्छ रहावा म्हणूनही नियोजन केले जाणार आहे. ‘करमाळ्याचा राजा’ म्हणून या मंडळाच्या गणपतीचा उल्लेख केला जातो. नवसाला पावणारा आमचा हा बापा असल्याचे येथील गणेशभक्त सांगत आहेत.

करमाळा शहरात सुभाष चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा दरम्यानचा भाग म्हणजे राशीन पेठ. दररोज नागरिकांच्या रहदारीने ही पेठ गजबजलेली असते. येथील नागरिकांनी एकत्र येऊन राशीन पेठ तरुण सेवा मंडळ सुरु केले. त्यानंतर त्यांनी गणेशोत्सव सुरु केला. गणेशोत्सव सुरु केला तेव्हापासून सामाजिक व धार्मिक कार्यक्रमावर त्यांनी भर दिला. मनोरंजन आणि सामाजिक बांधिलकी याचा त्यांनी मध्य साधण्याचा नेहमीच त्यांनी प्रयत्न केला आहे. गणेशोत्सवात त्यांचे विविध कार्यक्रम असतात.

‘नवं ते हवं’ या उक्तीप्रमाणे त्यांनी काळानुसार बदल स्वीकारत मंडळाच्या कार्यक्रमातही बदल केले. पहिल्यांदा कीर्तन, हरिपाठ, प्रवचन व काकडा असे कार्यक्रम घेतले जात होते. गणेशोत्सवात त्यांनी देखावे सादर करून सामाजिक विषयावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला. महिलांचा गणेशोत्सवात सहभाग असावा म्हणून सांस्कृतिक वेशभूषा, मोदक, संगीत खुर्ची अशा स्पर्धा घेतल्या जातात. चिमुकल्यांसाठीही वेगवेगळ्या स्पर्धा असतात. विद्यार्थ्यांसाठी मंडळाकडून वक्तृत्व, प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतल्या जातात.

राशीन पेठे तरुण सेवा मंडळाचे गणेश मंदिर आहे. तेथेच श्री ची प्रतिष्ठपणा केली जाते. बाल मंडळाचीही तेथेच गणेश मूर्ती आहे. क्रीडा क्षेत्रात तरुणांनी पुढे यावे म्हणूनही मंडळाकडून प्रोत्साहन दिले जाते. आषाढी एकादशी वेळी या मंडळाच्या वतीने पंढरपूरला जाणाऱ्या मानाच्या श्री निवृत्तीनाथ महाराज पालखीची सेवा केली जाते. तेव्हाही सर्वजण मनोभावे सेवा करतात. मंडळाच्या वतीने गणेशोत्सव काळात रोज पाच जोडप्यांना आरतीची संधी दिली जाते. वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या राशीन पेठची दखल ‘सा. संदेश’नेही घेतली होती.

राशीन पेठ तरुण सेवा मंडळातील सदस्य…
सोमनाथ चिवटे, अनिलभाऊ वाशिंबेकर, ललित अग्रवाल, नंदकुमार कोरपे, नागनाथ चिवटे, उद्धव कोठारी, संपत किरवे, गणेश अग्रवाल, गुंडप्पा चिवटे, रमेश भंडारे, बाळकृष्ण ओतारी, दीपक पाटणे, हेमंत काळे पाटील, राजेंद्र कटारिया, ताराचंद कांबळे, बंडू पारुडकर, बिपीन मरोठी, मनोज किरवे, संजय शिलवंत, डॉ. प्रमोद कांबळे, संतोष गुगळे, चंद्रशेखर शिलवंत, वासुदेव ओतारी, प्रकाश बागडे, बाळासाहेब बागडे, नाना होरणे, डॉ. वसंतराव पुंडे, बाळासाहेब कोकीळ, नितीन शियाळ, किरण किरवे, दिनेश किरवे, राहुल काटुळे, नंदकुमार पवार, उमेश अग्रवाल, गणेश चिवटे, सूरज कांबळे, शामराव पुराणिक, बापू कोकीळ, राजेंद्र चिवटे, दत्तात्रय भोसले, गणेश ममदापुरे, आतिश दोशी, मोतीराम कांबळे, राजेंद्र शियाळ, पप्पू बोकन, उस्मान तांबोळी, सलीम तांबोळी, रमजान तांबोळी, गणेश कोरपे, कैलास बरीदे, हर्षद मंत्री, संतोष वेंगलम, शरद कोकीळ, बच्चू जवकर, चंद्रकांत राजमाने, शिवाजी कोळेकर, गणेश माळी, चंद्रकांत खुटाळे, अब्दुल रज्जाक घोडके, देविदास चिवटे, रामभाऊ कांबळे, अजिनाथ कांबळे, मामा बागडे, साठे साहेब, गणेश महाडिक, डॉ. भांबळ, डॉ. महाजन, दादा भोसले, आदित्य श्रीवास्तव, पांडू श्रीवास्तव, दिनेश श्रीवास्तव, महेश चिवटे, सूर्यकांत चिवटे, महेंद्र कांबळे, ज्ञानदेव होनकळसे, गिरीश पटेल, किरण कोरपे, दिग्विजय चिवटे, ऋषिकेश अग्रवाल, चैतन्य किरवे, आयुष पाटणे, ओंकार चिवटे, शंभूराज चिवटे, राज भोसले, कृष्णा चिवटे, कल्पेश कोरपे, वरद किरवे, कृष्णा किरवे, गणेश झाडबुके, ओम परदेशी, आदित्य परदेशी, तेजस कांबळे, शार्दूल चिवटे, यश कोकीळ, ओम चिवटे, श्रेयस किरवे, निल पवार, श्री पवार, निदीश वाशिंबेकर, राघव चिवटे, अमरनाथ चिवटे, रुद्राक्ष शिलवंत, मंथन बागडे हे मंडळातील (बाल मंडळासह) सदस्य आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *