करमाळा (सोलापूर) :

बँकावर निर्बंधाचा भाग म्हणून दोन सहकारी बँका कर्ज देवू शकत नाहीत. त्याच बरोबर कोणतीही गुंतवणूक करु शकत नाहीत. कोणत्याही प्रकारच्या नवीन ठेवी स्विकारु शकत नाहीत. तसेच पैसे उधार घेणे व मालमत्तेचे विवरण करणे आदिवर निर्बंध घालण्यात आलेल्या आहेत. या तीन बँकांना निर्बंध जारी करणे म्हणजे त्यांचा बँक परवाना रद्द करणे असा अर्थ कोणी काढू नये. फक्त् बँकेची आर्थिक स्थिती सुधारणेपर्यंत व बँकेची स्थिती अधिक मजबुत करण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत, असे ही रिर्झव्ह बँकने म्हटले आहे.

करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी म्हणाले, RBI च्या सुचनेनुसार बँकेच्या कामकाजामध्ये सुधारणा करुन जवळपास 1 कोटीचे भागभांडवल जमा केलेले आहे. त्या बरोबर 3.50 कोटीची थकीत वसुली केली आहे. हा अहवाल आम्हीं आठ दिवसामध्ये RBI ला सादर करणार असून महिन्याच्या आत बँकेवरील सर्व निर्बंध उठविले जातील.

त्याच बरोबर सध्या बँकेकडे ज्या नागरिकांच्या ठेवी आहेत त्या ठेवी सुरक्षित असून या ठेवींना विमा कवच असल्यामुळे ठेवीदारांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही सर्व ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असून ठेवीदारांनी निश्चिंत रहावे असे देवी यांनी सांगितले आहे.
