काही प्रमुख दैनिकात करमाळाच्या आलेल्या महत्त्वाच्या बातम्या वाचा एकाच ठिकाणी

Read the Karmala news in the daily news paper in one place

करमाळा (सोलापूर) : दैनिकांमध्ये करमाळ्यातील रोज महत्त्वाच्या घडामोडी येतात. त्यापैकीच काही दैनिकांमध्ये शुक्रवारी (ता. १६) कोणत्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.

दहिगाव योजनेचे पाणी २० मेपर्यंत सुरु राहणार
दहिगाव पाणी उपसा सिंचन योजनेचे आवर्तन 27 जानेवारीला सुरू झाले. त्याला जोडूनच उन्हाळी आवर्तन सध्या सुरू आहे. हे आवर्तन अखंडितपणे सुरू राहणार असून 20 मेपर्यंत ते चालणार असल्याची माहिती आमदार संजय शिंदे यांनी दिली आहे. कुंभोज येथील चार पैकी एक पंप नादुरुस्त असल्यामुळे व इतर तांत्रिक बिघाडामुळे आवर्तन पोहोचवण्यासाठी उशीर होत असून पंधरा दिवसात सर्वांना पाणी मिळेल असे शिंदे यांनी म्हटले आहे. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले.

नगराध्यक्ष वैभव जगताप यांचा मोबाईल चोरीला
करमाळ्याचे नगराध्यक्ष वैभव जगताप यांच्यावर बार्शी येथे उपचार सुरू असताना त्यांचा मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जगताप यांनी बार्शी पोलिसांत तक्रार दिली आहे. जगताप हेएप्रिलपासून उपचारासाठी बार्शीत ॲडमिट आहेत . 10 एप्रिलला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या हाताला सलाईन सुरु असताना त्यांना झोप लागली. तेव्हा त्यांचा मोबाईल उशाला चार्जिंगला लावला होता. तेथून त्यांचा मोबाईल चोरीला गेला आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जमुक्त
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीने एक कोटी 45 लाख रुपयांची देणी देऊन 31 मार्चअखेर कर्ज मुक्त झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. करमाळा बाजार समितीच्या 31 मार्च 2021 अखेरच्या आर्थिक वर्षाचा अहवाल पत्रकार परिषदेत संचालक मंडळाच्या उपस्थित प्रा. बंडगर यांनी मांडला. 2015- 16 या आर्थिक वर्षात केंद्रीय ग्रामीण गोडवण योजनेच्या अंतर्गत गोडवान मंजूर झाले होते. ही योजना 1 कोटी रुपयांची होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

पांडे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
पांडे येथे विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. नालंदा बुद्ध विहार येथे तुकाराम शिरसागर, नितीन निकम, दिलीप पवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. पांडे ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच आनिता मोठे, उपसरपंच शिवाजी भोसले, यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. भीम दल सामाजिक संघटनेच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला मारुती भोसले, सुनील भोसले, तुकाराम शिरसागर, मधुकर भोसले, सुखदेव भोसले, अर्जुन भोसले, विजय भोसले, आप्पा भोसले, महादेव भोसले, अनिल निकम, अनिल तेली, प्रल्हाद भोसले उपस्थित होते. याबाबतचे वृत्त ‘पुण्यनगरी’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *