करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील काही दैनिकांमध्ये आलेल्या काही बातम्यांचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.
सोगाव प येथे आरओ प्लांटचे नुकसान
ॲट्रॉसिटीची धमकी देणाऱ्या विरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सोगाव (प) येथे आरो प्लांटच्या पाण्याच्या कॉईन बॉक्सचे व इतर साहित्याची तोडफोड करून सरकारी मालमत्तेचे नुकसान करणारा कैलास पाखरे यांनी दाखल केली तर मी माहिती देणाऱ्या विरुद्ध ॲट्रोसिटी दाखल करेल, अशी धमकी दिली. यात कैलास पाखरे विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ग्रामसेवक नेमचंद भुजबळ यांनी फिर्याद दिली आहे. १५ एप्रिलला दुपारी तीनच्या सुमारास सोगाव पश्चिम येथील शरद तुळशीदास गोडसे यांनी ग्रामसेवक नेमचंद भुजबळ यांना फोन करून सांगितले की, गावातील कैलास हनुमंत पारखी यांनी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या कार्यालय समोर असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आरो प्लांटचे नुकसान केले आहे. याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी आजचा ‘सकाळ’ पहा.
आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधीतांची संख्या वाढतेय
करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. होम आयसोल्युशनला परवानगी नसली तरी बाधित रुग्ण घरी उपचार घेण्याचे सांगून मुक्तपणे फिरत असल्याने कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्याशिवाय संपूर्ण कुटुंब बाधित होत असल्याचे प्रमाणही जास्त आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. ग्रामीण भागात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पथकाची नेमणूक केली होती. यामध्ये शहरातून गावी आलेल्यांना सात दिवस कॉरंटाईन केले जात होते. त्यामुळे गावाकडे येणाऱ्यांचे प्रमाण कमी होते. परंतु दुसऱ्या लाटेत ही खबरदारी घेतली गेली नाही. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी ‘लोकमत’चा अंक पहा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रोज नवा विषय उपक्रम
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध कार्याची माहिती देण्यासाठी रोज नवा विषय उपक्रम येथील कवी व्याख्याते जगदीश ओहोळ यांनी राबविला आहे. याबाबतचे वृत्त ‘संचार’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी आजचा ‘संचार’ पहा.
संपादन : अशोक मुरुमकर