करमाळा (सोलापूर) : युवा सेनेच्या करमाळा तालुकाप्रमुख व शहर प्रमुखासह 15 पदाधिकाऱ्यांनी युवा सेनेचे युवा सेनेचे सचिव वरून सरदेसाई यांच्याकडे राजीनामे पाठवले आहेत. शिवसेनेचे प्रामाणिक काम करत असताना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांच्याबाबत वारंवार वरिष्ठांकडे तक्रारी केल्या पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आम्ही राजीनामा देत असल्याचे तालुका प्रमुख राहुल कानगुडे व शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी शुक्रवारी (ता. २) सांगितले आहे.
उपशहर प्रमुख अविनाश भिसे, करण काळे, तालुका समन्वयक दादासाहेब तनपुरे, उपतालुकाप्रमुख पांडुरंग ढाणे, अशोक रंधवे, उपतालुकाप्रमुख सागर कोकाटे यांच्यासह 15 पदाधिकाऱ्यानी राजीनामे पाठवून दिले आहेत, असे कानगुडे व गायकवाड यांनी सांगितले आहे.