विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निकमध्ये रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती

-

इंदापूर : विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे यासह हेल्मेट व सीट बेल्टचा करावा याविषयी ‘स्टुडन्ट मेंटेरिंग सिस्टीम’ अंतर्गत रस्ता सुरक्षा अभियनांतर्गत जनजागृती करण्यात आली.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती व विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर यांच्या वतीने महाविद्यालयातील सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास मोटार वाहन निरीक्षक पद्माकर भालेकर, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक तेजस मखरे व रोहित भोसले तसेच इंदापूर येथील पोलिस कॉन्स्टेबल सुहास करणे, अमोल खाडे, अनिल नागरगोजे उपस्थित होते.

या जनजागृती पर कार्यक्रमा मधून सिग्नलचे पालन करा, गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नका, कानाला हेडफोन लावू नका, गाडी चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करा याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन स्टुडन्ट मेंटेरिंग सिस्टीमचे प्रीसायडिंग ऑफिसर प्रा. राजीव वाघमारे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता बारामती येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. सोनाली काळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *