करमाळा (सोलापूर) : गुरुकुल स्कूलमध्ये रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त मार्गदर्शन करण्यात आले. RTO ऑफिसर आश्विनी जगताप (Assistant motor vehicle inspector Akluj), संतोष मखरे, (वाहन चालक), अभिजित कांबळे (वाहन चालक) यांनी वाहन चालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जगताप यांनी विद्यार्थ्यांना शाळेत जाताना व येताना काय काळजी घ्यावी व वाहनांचे नियम चिन्ह कोणते त्याला काय म्हणतात याची माहिती दिली. वाहन चालक परवाना सगळ्यांकडे असणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. दरम्यान गुरुकुल पब्लिक स्कूलचे नितीन भोगे व HOD शिंदे, पवार उपस्थित होते. सूत्रसंचालन बी. एस. आव्हाड यांनी केले.
