करमाळा : तालुक्यात ऍट्रॉसिटीअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करा, या मागणीसाठी आंदोलन केले जाईल, असा इशारा आरपीआय (आ) युवकचे जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे यांनी दिला आहे. निवेदनाद्वारे त्यांनी हा इशारा दिला आहे. २० दिवसांपेक्षा जास्त दिवस होऊनही संशयित आरोपी अटकेत नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे. संशयित आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. शुक्रवारी (ता. 28) दुपारी 12:30 वाजता गायकवाड चौक ते तहसील कचेरीवर ‘जवाब दो’आंदोलन केले जाणार असल्याचे यामध्ये म्हटले आहे.
