करमाळा (सोलापूर) :

भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, आरपीआय युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे, दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, करमाळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ, भिमराव कांबळे, प्रसंजीत कांबळे, नामदेव वाघमारे, दत्ता बडेकर, विजय वाघमारे, रणजीत कांबळे, प्रेम कुमार सरतापे, नितीन भोसले यावेळी उपस्थित होते.

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती अंजनडोह येथे कार्यक्रम झाला. यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. दरम्यान कांबळे यांना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जयंती उत्सव समितीच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पप्पू रोकडे, उपाध्यक्ष नवनाथ रणदिवे, खजिनदार दीपक रणदिवे, A.B.S. BOY’S मित्रपरिवार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.