करमाळा (सोलापूर) : करमाळा वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरातून दोन चंदनाच्या झाडांची चोरी झाली आहे. यामध्ये करमाळा पोलिसात तीन अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वनमजूर रघुनाथ रेगुडे यांनी याप्रकरणात फिर्याद दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. साधारण १० हजार रुपयांची ही झाडे आहेत. याचा तपास करमाळा पोलिसात करत आहेत. ८ तारखेला रात्री दीड वाजताच्या सुमारास ही झाडे चोरीला गेली आहेत. अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यानी ही झाडे चोरून नेली आहेत. याचा तपास सुरु आहे.