करमाळा (सोलापूर) : करमाळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व्यापारी विजयकुमार गुगळे यांच्या मातोश्री सरसबाई चंपालाल गुगळे (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले आहे. गुगळे यांची इच्छा व संकल्पानुसार मृत्यूनंतर नेत्रदान केले आहे. त्यांचे पश्चात कॉन्ट्रॅक्टर संतोषकुमार गुगळे, व्यापारी विजयकुमार गुगळे व सोन्याचे व्यापारी अजयकुमार गुगळे हे तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी व्यापारी तसेच राजकीय, सामाजीक क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.


