करमाळा (सोलापूर) : गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती, बालिका दिन व पोलिस दलाचा रेझिंग डे साजरा झाल. पोलिस निरीक्षक विनोद घुगे, पोलिस उपनिरीक्षक गणेश दळवी व पोलिस अंमलदार राजन सातव यावेळी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणांच्या ओव्यांच्या व नाटकाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. स्त्री शिक्षणात सावित्रीबाई फुले यांचा सिंहाचा वाटा आहे हे विद्यार्थ्यांनी नाटकातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला.
8 जानेवारीपर्यंत महाराष्ट्र पोलिस दलाचा रेझिंग डे साजरा करण्यात येत आहे. यावेळी विद्यार्थ्यांना पोलिस दलातील विविध शस्त्रांविषयी माहिती देण्यात आली. पोलिस आणि समाज यांच्यातील नाते अधिक दृढ करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये शस्त्र प्रदर्शन, विविध स्पर्धा, सायबर गुन्ह्यांची माहिती देण्यात आली. संस्थेचे संस्थापक नितीन भोगे व सौ. भोगे यावेळी उपस्थित होत्या.