सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभाग; शिंदे- फडणवीस सरकारचे खाते वाटप जाहीर

Sawant has the Department of Public Health Shinde Fadnavis government department allocation announced

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे खातेवाटप जाहीर झाले आहे. यामध्ये प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण हा विभाग देण्यात आला आहे. फडणवीस यांच्याकडे अर्थ व गृह विभाग देण्यात आला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल विभाग देण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement

गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास विभाग देण्यात आला आहे. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता खातेवाटप जाहीर झाले आहे. दादा भुसे यांना खनिकर्म विभाग देण्यात आला आहे. अबबदूल सतार यांच्याकडे कृषी विभाग देण्यात आला आहे. उदय सामंत यांना उद्योग विभाग देण्यात आला आहे. रवींद्र चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग देण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण विभाग देण्यात आला आहे. संजय राठोड यांच्याकडे अन्न औषध विभाग देण्यात आला आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडे सार्वजनिक पाणी पुरवठा विभाग देण्यात आला आहे.

  • असे आहे खाते वाटप
  • राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
  • सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
  • चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
  • डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास
  • गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
  • गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
  • दादा भुसे- बंदरे व खनिकर्म
  • सुरेश खाडे- कामगार
  • संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
  • उदय सामंत- उद्योग
  • प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
  • रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
  • अब्दुल सत्तार- कृषी
  • दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
  • अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
  • शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क
  • मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *