करमाळा (सोलापूर) : शहरातील छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या गणेशोत्सव 2022 च्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच जाहीर झाली आहे. यामध्ये अध्यक्ष म्हणून गणेश सावळकर यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्ष म्हणून शाहरुख मुलाणी व समाधान सुरवसे यांची निवड झाली आहे. याबरोबर मिरवणूक प्रमुख म्हणून बापू उबाळे, संघटक म्हणून आकाश जाधव, खजिनदार म्हणून योगेश काकडे, सहखजिनदार म्हणून सागर सामसे व सचिव म्हणून सुखदेव उबाळे यांची निवड झाली आहे. मिरवणूक उपप्रमुख म्हणून गोरख आगम व सहसचिव म्हणून गणेश मोरे यांची सर्वांनुमते निवड झाली आहे, अशी माहिती सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांनी दिले आहे.
