करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वडशिवणे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी विशाल जगदाळे व उपसरपंचपदी अमोल उघडे यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांचा बागल गटाच्या संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला. बागल गटाचे नेते मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या हस्ते हा सत्कार झाला.

यावेळी माजी संचालक गोरख जगदाळे, माजी सरपंच रामचंद्र व्हरे, माजी सरपंच लक्ष्मण मोरे, माजी सरपंच कालिदास पन्हाळकर, माजी सरपंच संतोष कवडे, माजी सरपंच हनुमंत वाघमारे, माजी उपसरपंच जयवंत व्हरे, माजी चेअरमन ज्ञानदेव तोरस्कर, माधव साळुंखे, आबा कवडे, जोतिराम वाघमारे, परमेश्वर जाधव,कुबेर कोडलिंगे तसेच इतर सहकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
