करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र बँकेच्या करमाळा शाखेचे शाखा व्यवस्थापक म्हणून शशांक कुमार हे आले आहेत. त्यांचे आळजापूर येथील बँकेच्या ग्राहकांनी स्वागत केले. शुक्रवारी (ता. २९) हे स्वागत करण्यात आले. यावेळी आळजापूर विविध विकास कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक दत्तात्रय टेंबाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ रोडे, प्रगतशील बागायतदार पंढरीनाथ शेवाळे, बुवासाहेब नवले आदी उपस्थित होते.

आळजापूर येथील ग्राहकांनी करमाळा येथील महाराष्ट्र बँकेच्या कार्यालयात शशांक कुमार यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी बँकेतील अविनाश पेंटे, श्री. दुर्गुळे, रवींद्र कुलकर्णी, बलभीम बागल व बँक सखी अश्विनी घोडके आदी उपस्थित होते.




