शेटफळचा तारा अखेर निखळला

जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला! शेटफळ येथील नागनाथ लेझीम संघाचे आधारस्तंभ, उत्तम कब्बडीपट्टू प्रसिद्ध भजन गायक, शेटफळ गावाचं अष्टपैलू व्यक्तिमत्व बिभिषण बलभीम मोरे (वय 55) यांचे आज पहाटे दु:खद निधन झाले. त्यांच्या या अकाली जाण्याने केवळ मोरे परिवाचेच नुकसान झाले नाही तर संपूर्ण शेटफळ गावाची हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने आज गावावर शोककळा पसरली आहे. लहानपणापासुन खेळाची आवड असणाऱ्या मोरे यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात अनेक कब्बडीची मैदाने गाजवली. अनेक सामन्यात एकट्याच्या खेळावर अनेक विजय खेचून आणले. कब्बडी व लेझीम हा त्यांचा विक पॉइंट होता.

गावातील कोणत्याही कार्यक्रम असो ते सर्वात पुढे असायचे. ते आल्याशिवाय लेझीम खेळाला सुरुवात होत नसायची, लग्न असो वरात असो, शिवजयंती असो वा गणेशोत्सव तासन् तास लेझीम खेळणारे मोरे आम्ही सर्वांनी पाहीले आहेत. गावातील जुन्या भजनी मंडळांमध्ये ते लहानपणापासूनच भजन शिकायला जात असत कसलीही प्रशिक्षण शिक्षण न घेता केवळ ऐकून ते भजन म्हणायला शिकले. त्यांच्या पहाडी आवाजामुळे लवकर उत्कृष्ट भजन गायक म्हणून ते समोर आले. अनेक प्रसिद्ध किर्तनकारांना त्यांनी साथ केली आहे. कीर्तनातील शेवटची चाल ते फारच गोड म्हणत. त्यामुळे मोरे आणी भैरवी हे समिकरण कित्येक दिवस शेटफळ परिसरातील सुरू होते. एक मुलगा एक मुलगी असा सुखी परिवार असताना तात्यांच्या संसाराला दृष्ट लागली. ऐन उमेदीच्या काळात त्यांना कॅन्सरने गाठलं. सुरवातीला पोटदुखी, ॲपेंनडेक्स या आजारावर घालवलं लवकर निदान झाले नाही. ज्यावेळी निदान झाले तेंव्हा पुढची स्टेज गाठली होती. अनेक प्रयत्न केले परंतु नाविलाज झाला.

मोरे तुमचं ऐन तरूणपणात आम्हाला सोडून जाणं मनाला पटतं नाही रूचत नाही. आज गाव एका उत्तम खेळाडू, गुणी कलाकाराला मुकलं आहे. तुम्ही आमच्या शेटफळ गावाचं भुषण होता. तुम्ही तर गेलात राहील्यात फक्त आठवणी. या शेटफळ गावातील उत्सव सणाला तुमची आठवण येत राहील. शारिरीक दृष्ट्या आपण आमच्यातून गेला असला तरी तुमच्या आठवणी शेटफळकरांच्या मनामनात राहतील.

अंथरुणाला खेळून असताना गेल्या महिन्यात भंडारा उत्सवादिवसी त्यांना नागनाथ पालखी दारात आल्यानंतर गायलेले भजन शेवटचेच भजन ठरले.

गजेंद्र पोळ, शेटफळ (ना)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *