सोलापूर जिल्ह्यात ठाकरे गटाच्या वतीने ‘शिवगर्जना’ अभियान

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गुरुवारपासून (ता. २) ठाकरे गटाच्या वतीने ‘शिवगर्जना’ अभियान सुरु होणार आहे. शिवर्जन अभियानासाठी सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यासाठी विनोद गोसाळकर, विजय कदम, सुभाष वानखेडे, उल्हास पाटील व साईनाथ दुर्गे हे पदाधीकारी मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल कोकीळ यांनी दिली आहे.

कोकीळ म्हणाले, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात ही ‘शिवगर्जना’ अभियान राबवले जाणार आहे. यामध्ये गुरुवारी पंढरपूर, माळशिरस, सांगोला व करमाळा येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे. शुक्रवारी (ता. ३) मोहोळ, बार्शी व मंगळवेढा येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे. तर शनिवारी (ता. ४) सोलापूर उत्तर, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण व अक्कलकोट तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *