सोलापूर पॅसेंजर आता एक्सप्रेस स्वरुपात

Solapur passenger now in express form

केत्तूर (अभय माने) : कोरोना काळ तसेच रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरण या काळात बंद असलेली पुणे- सोलापूर- पुणे पॅसेंजरगाडी प्रदीर्घ विश्रांतीनंतर आता गुरुवारपासून (ता. 15) एक्सप्रेस स्वरूपात सुरू झाली आहे. या गाडीतील सर्व डबे अनारक्षित असल्याने या मार्गावरील प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. पुणे सोलापूर पुणे ही एक्सप्रेस गाडी पुण्याहून रात्री 11.00 वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी ती सकाळी 7.55 ला सोलापूरला पोहोचेल व सोलापूर येथून दुसऱ्या दिवशी हीच गाडी 11.40 ला सुटून पुण्याकडे धावेल व पुणे येथे सायंकाळी 7:25 ला पोहोचेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *