सोलापूरच्या शिक्षकाला मिळाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधण्याची संधी

Solapur teacher got a chance to interact with Chief Minister Eknath Shinde

सोलापूर : शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार (ता. ५) राज्यातील शिक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला. यावेळी जिल्ह्यातील गावडेवाडीच्या शिक्षकाला प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था प्रशासनाने केली होती. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शिक्षण उपसंचालक उकिरडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्यासह विस्तार अधिकारी उपस्थित होते.

कोरोनानंतर या वर्षी शैक्षणिक वर्ष नियमितपणे सुरु झाले आहे. केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करण्याचे जाहीर केले आहे. या अनुषंगाने राज्यातील शैक्षणिक क्षेत्रातील विविध मुद्दे आणि नवी दिशा यांचा या संवादादरम्यान ऊहापोह झाला. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी जिल्हा परिषद शाळेचे पदवीधर शिक्षक डॉ. नागनाथ येवले यांना मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

येवले यांनी, सध्या पालकांचा ओढा हा एनसीइआरटी अभ्यासक्रम राबविणाऱ्या सिबीएससी, आयसीएसई, कॅमब्रीजकडे वाढत आहे. त्यामुळे वन नेशन, वन एज्युकेशन नुसार एनसीइआरटी अभ्यासक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवाल का? असा प्रश्न विचारला. तसेच शैक्षणिक साहित्य, संगणक, इंटरनेट याबाबतचे प्रश्न महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी विचारले असता मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात येईल, असे आश्वासन देखील यावेळी दिेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *