‘भुज’मध्ये एक धाकड व्यक्तीरेखा साकारल्यानंतर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच पुन्हा एकदा नव्यारूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा ‘ककुडा’ पूर्ण झाला असून, ‘डबल एक्सएल’ हा चित्रपट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या चित्रपटाखेरीज सोनाक्षीकडे आणखी एक महत्त्वाचा चित्रपट आहे. ज्याचे चित्रकरण नुकतेच सुरू झाला आहे. ‘निकिता रॉय’ असं या चित्रपटाचे नाव आहे.
सोनाक्षीच्या चित्रपटाचे शूटिंग युकेमध्ये सुरू झाले आहे. या चित्रपटात सोनाक्षी टायटल रोलमध्ये दिसणार आहे. सोनाक्षीचा भाऊ कुश सिन्हा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. प्रथमच दिग्दर्शन करणारा कुश पदार्पणातच काही रहस्यमय कथानक घेऊन येत आहे. लंडनमध्ये या चित्रपटात 40 दिवसाचे शूटिंग शेड्युल होणार आहे. यात परेश रावल आणि सुशील नायर यांच्याशी भूमिका आहेत. यापूर्वी नेहमीच विविध अंगी भूमिकेत धडकलेली सोनक्षी यात कशा प्रकारची निकिता साकर्ते हे पहावयाचे आहे. निकी भगनानी, विकी भगनानी आणि अंकुर ताकरनी, किंजल घोणे आणि दिनेश गुप्ता या चित्रपटाचे निर्माते आहेत.


