करमाळा (सोलापूर) : करमाळा येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळने (एमआयडीसी) काम पूर्ण करून व्यवसायिकांना जागा उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी, अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे भाजपचे दीपक चव्हाण यांनी मंगळवारी (ता. 23) मंत्रालयात भेट घेऊन केली आहे. याबाबत त्यांनी फेसबुकवर माहिती दिली आहे.

चव्हाण यांनी मंत्री सामंत यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘करमाळा येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) जागा आरक्षित करून अनेक वर्ष झाले आहेत. ही जागा विकसित करून नवीन व्यावसायिकांना प्लॉट उपलब्ध करून द्यावेत. यासाठी ज्या अडचणी असतील त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न सोडवावा. याबरोबर योग्य ती कार्यवाही करावी, त्यामुळे करमाळा व तालुक्यातील उद्योग, व्यवसाय व रोजगार निर्मिती होईल, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
– म्हणून आबांना पुन्हा आमदार करणे हीच खरी सदिच्छा असणार!
– नागरी सत्काराला उत्तर देताना ‘आदिनाथ’बाबत माजी आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला ठाम विश्वास
