प्राचार्य नरारे यांनी सुरताल संगीत विद्यालयाच्या माध्यमातून करमाळ्याचे नाव महाराष्ट्रात नव्हे तर देशात केले : घुमरे

Sri Kamalbhavani Multipurpose Institution Run Surtal Sangeet Vidyalaya

करमाळा (सोलापूर) : प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सुरताल संगीत विद्यालयाच्या माध्यमातून करमाळा तालुक्याचे नाव महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात केले, असे गौरवोद्गार विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी काढले. श्री कमलाभवानी बहुउद्देशी संस्था संचलित सुरताल संगीत विद्यालय यांच्या वतीने पंडित कै. के. एन. बोळंगे गुरुजी, कै. पंडित विष्णू दिगंबर यांच्या पुण्यतिथीनिमित्त व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त आंतरराष्ट्रीय सुरताल संगीत नृत्य महोत्सव झाला. प्राथमिक शिक्षक जिल्हा सोसायटीच्या सभागृहात हा महोत्सव झाला.

या महोत्सवसाठी वेगवेगळ्या राज्यासह व परदेशातून अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने संगीत, नृत्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुणे येथील कथक नृत्यांगना डॉ. सुनिता जमदाडे , भारतीय समकालीन नृत्यांगना रूपाकार कोलकता, मुंबई येथील कथक नृत्यांगना गुरु मनीषा पात्रीकर, सोलापूर येथील भरतनाट्यम नृत्यकार श्रीनिवास काटवे, बांगलादेश येथील गीत गायिका रुकसाना यास्मिन नजरुल, कथक नृत्यांगना (कोलकत्ता) मधुमिता कर्मकार, कथक नृत्यांगना (मुंबई) हर्षिता हाटे, भरतनाट्यम नृत्यांगना (दिल्ली) जागृती भटनागर, ओडिसी येथील नृत्यांगना शुभश्री जयसिंग या कलाकारांना यावेळी ‘सुर सरस्वती अवॉर्ड’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांना यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देण्यात आले. या पुरस्कार वितरणप्रसंगी यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक शेठ खाटेर, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, माजी नगरसेविका स्वाती फंड, महादेव फंड, बाळासाहेब गोरे, राजेंद्र वाशिंबेकर उपस्थित होते.
म्हणून आबांना पुन्हा आमदार करणे हीच खरी सदिच्छा असणार!

भाजपचे प्रदेश सरचिटणीस दीपक चव्हाण, साहित्यिका अंजली श्रीवास्तव, पत्रकार दिनेश मडके, नरेंद्र ठाकूर, सिद्धार्थ वाघमारे, जयंत कोष्टी, शितलकुमार मोटे, नाना पठाडे उपस्थित होते. प्रास्ताविक सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी तर सूत्रसंचालन संतोष पोतदार यांनी केले. उपस्थितांचे स्वागत लक्ष्मण लष्कर, डाॅ. महेशचंद्र वीर, दिगंबर पवार यांनी तर आभार स्वराली जाधव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *