केत्तूर (अभय माने) : मध्य रेल्वे मार्गावरील सोलापूर- पुणे व पुणे- सोलापूर ही पॅसेंजर (डेमो) कोरोना काळापासून बंद आहे. या मार्गावरील रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरण या कामामुळे गाड्या बंदच होत्या परंतु आता कोरोना संपला आहे व रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण कामही संपले आहे. त्याची चाचणी यशस्वी करण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील इतर एक्सप्रेस गाड्या सुरळीत सुरू झाल्या असल्यातरी गरिबांची पॅसेंजर मात्र अद्यापही बंद आहे.

या गाड्या पूर्ववत सुरू झाल्यास सोलापूर, पुणे, दौंड, भिगवण, जेऊर, कुर्डूवाडी येथील प्रवाशांची सोय होणार आहे. रेल्वे मार्गाची दुहेरीकरण व विद्युतीकरण झाल्यानंतर या मार्गावर जादा गाड्या सुरू होतील ही अपेक्षा मात्र रेल्वे प्रशासनाने फोलच ठरविली आहे. कमीत कमी बंद झालेली पॅसेंजर (डेमो) गाडी तरी पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहेत.

