करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी चोरी टाळण्यासाठी घराबाहेर जाताना मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवावी, असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक प्रवीण साने यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे केले आहे. शुक्रवारी (ता. २३) निभोरे येथे भरदुपारी चोरी झाली आहे. त्यानंतर करमाळा पोलिस ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. चोऱ्या टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन नागरिकांना केले जात आहे. पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिस उपनिरीक्षक साने यांनी म्हटले आहे की, करमाळा तालुक्यातील नागरिकांनी घराबाहेर जाताना मौल्यवान वस्तू, पैसे व दागिने सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. चोरी होऊ नये म्हणून नागरिकांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे. घराबाहेर जाताना सर्व साहित्य व्यवस्थित ठिकाणी ठेऊनच जावे.

