करमाळा (सोलापूर) : सार्वजनिक गणेशोत्सव म्हटले की मंडळ आलेच! मग त्यात अध्यक्ष, सचिव, खजिनदार, कार्याध्यक्ष अशी विविध जबाबदारी बैठकीत सदस्यांवर दिली जाते. पण करमाळा शहरात एक असे मंडळ आहे त्यामध्ये अध्यक्ष व इतर निवडी केल्या जात नाहीत. ते मंडळ म्हणजे मेन रोडवरील गजराज तरुण मंडळ. या मंडळातील सर्व सदस्य हे अध्यक्ष म्हणूनच जबाबदारी घेऊन कर्तव्य पार पडतात. १९६५ मध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी एकत्र येऊन हे मंडळ सुरु केले होते. गणेशोत्सवात या मंडळाचे अनेक कार्यक्रम असतात. त्यानंतर वर्षभरही त्यांच्याकडून उपक्रम राबवले जातात.
करमाळा शहरातील मेन रोडवर हे गणेशोत्सव मंडळ आहे. या मंडळाची विद्युत रोषणाई अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. आतापर्यंत करमाळ्यात सर्वात आधी आम्ही विद्यूत रोषणाईचे नाविन्यपूर्ण प्रकार आणले असल्याचा दावा या मंडळातील सद्य करत आहेत. कोरोना कालावधीमध्ये मंडळाने रुग्णांना जेवणे देऊन सेवा केली. याशिवाय गरजू व्यक्तींची मुले दत्तक घेऊन त्यांची शैक्षणिक जबाबदारी या मंडळाने उचलली होती. शासकीय सेवेत, व्यापार, डॉक्टर, सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी एकत्र येऊन हे मंडळ सुरु केले होते. तीच परंपरा कार्यकर्त्यांनी पुढे कायम ठेवली.
गणेशोत्सव काळात लहान मुले, महिला यांचा सहभाग वाढावा म्हणून त्यांच्यासाठीही विविध कार्यक्रम मंडळाच्या वतीने घेतले जातात. सांस्कृतीक कार्यक्रम, होम मिनिस्टर, वत्कृत्व स्पर्धा, स्पर्धा परीक्षा, गरजू विद्यार्थ्यांना गणवेश- वही पुस्तके वाटप, कोवीड काळात कोवीड नातेवाईकांना जेवणाची सोय, भव्य विद्युत रोषणाई, मावळचे झांज पथक असे वैशीष्ट्यपूर्ण कार्यक्रम घेणाऱ्या या मंडळाने आतापर्यंत अध्यक्ष निवड कधीच केली नाही. सर्वच स्वतः अध्यक्ष समजून काम करतात. मंडळासाठी सर्वजण राजकीय जोडे बाजूला ठेवतात. सामाजिक उपक्रम राबवताना गल्लीतील नगरपालीका शाळेला १०० वर्षापुर्तीनिमित्त रंगरंगोटी करून शाळेतील मुले दत्तक घेतली होती.
Video नंदन प्रतिष्ठान : वेगवेगळ्या क्षेत्रातील तरुण एकत्र येऊन राबवतायेत सामाजिक उपक्रम
१९६५ मध्ये शामसिंग परदेशी, प्रदीप पाटील, अशोक क्षिरसागर, रमाकांत बरीदे, सुरेश मेरुकर, अरुणसिंग परदेशी, सोमनाथ महाजन, अशोक पेंटर, दतात्रेय क्षिरसागर, सुरेश व्होरा, रमेश लिमकर, पोपट वीर, बाबासाहेब बरीदे यांनी या मंडळाची स्थापना केली. पुढे डॉ. चंद्रकांत वीर, रुद्रकुमार चोपडे, शशिकांत वनारसे, बाळासाहेब क्षिरसागर, बाबुशेठ रच्चा, सुहास व्होरा, लक्ष्मीकांत रच्चा, बंडू बरीदे, कैलाश परदेशी, संजय महाजन, सुधीर महाजन, विठ्ठल क्षीरसागर, रविंद्र बरीदे, अनिल क्षिरसागर, महेश कारटकर, राजेंद्र परदेशी, डॉ. महेश वीर, हर्षद वीर, अनिल चिवटे, आतिश दोशी, महेश परदेशी, राहुल लिमकर, प्रकाश क्षीरसागर, शंभु मेरुकर, सागर वनारसे, संदीप व्होरा, जीवन बरीदे, आनंद कारटकर, उमेश महाजन, श्रीनाथ खाडे, गजराज बरीदे, प्रसाद क्षीरसागर, भुषण महाजन, व्यंकटेश चोपडे, महावीर दोशी, अनुज देवी, पंकज वाघमारे, शिवाजी सरडे, ओम चोपडे, अजित सोळंकी, नितीन दामोदरे, सुरज वनारसे, अजिंक्य पाटील, रणधीर परदेशी, रोहीत वाघमारे, अक्षय साळुंके, प्रकाश मुनोत, रोहीत वाघमारे, राजेंद्र वासाणी, प्रितम क्षीरसागर, सागर बरीदे, अशोक बरीदे, शुभम महाजन, रोहीत महाजन, किशोर पवार आदीजण काम पाहत आहेत.
संपादन : अशोक मुरूमकर