करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वाशिंबे येथील शरदचंद्र पवार विद्यालयात एका अल्पवयीन मुलाला शिक्षकाने मारहाण केली असल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये संबंधित शिक्षकाविरुद्ध करमाळा पोलिसात मुलांची काळजी व संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वच्छता करताना हा प्रकार घडला आहे. यामध्ये मुलाच्या वडिलांनी याप्रकरणात फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीत म्हटले आहे की, स्वातंत्रदिनानिमित्त १२ तारखेला शाळेत स्वच्छता करण्याचे काम सुरु होते. तेव्हा संबंधित मुलाला या शाळेतील शिक्षकाने पाईपने मारले. कानाच्यावर डोक्याला, पायावर पाईप मारला. त्यानंतर त्याला गावातील रुग्णालयात उपचार करून सोलापूर, बारामती व भिगवण येथे उपचार केले.