करमाळा (सोलापूर) :

रावगाव येथील शेळकेवस्ती ते रावगाव या रस्त्यावरून पाचवी ते दहावीपर्यंतची 40 ते 50 मुले ये- जा करत असतात. या रस्त्याप्रमाणेच धगटवाडी ते रावगाव आणि आणि वाघमारेवस्ती ते रावगाव रस्त्यांची परिस्थिती झाली आहे. वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनसुद्धा राजकीय हेतूमुळे ग्रामपंचायत लक्ष देत नाही, असे शेळके यांनी म्हटले आहे.

या रस्त्यावरून ये- जा करणारी मुले शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांना शिकण्यासाठी बाहेरगावी पाठवायचे म्हटलं तर बऱ्याच लोकांची आयपत नाही. पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय येथील मुख्याध्यापक कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांचा स्टॉप चांगला असून याच शाळेत मुलांना घालण्याकडे नागरिकांचा कल आहे. तरी हे सर्व रस्ते ग्रामपंचायतने आठदिवसाच्या आत दुरुस्त करावेत. अन्यथा रावगाव ग्रामपंचायतसाठी जे तालुक्यातील दानशूर व्यक्ती असतील त्यांच्याकडे जाऊन भीक मागो आंदोलन करून हा रस्ता सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन दुरुस्त करू, असे शेळके यांनी म्हटले आहे.
