मुलांनी शिक्षण घेऊन मोठं व्हावं म्हणून अनेकदा आई- वडिलांनी स्वतःच्या इच्छा अपूर्ण ठेवल्या. परस्थितीचे कारण न करता जिद्दीने शिक्षण घेतले आणि प्रीती शेटे डॉक्टर झाल्या. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा पण प्रामाणिकपणे काम करा, असे त्या आत्मविश्वासाने सांगत आहेत. करमाळा शहरात श्री कमलादेवी रोडवर आयसीआयसी बँकेच्या वरील मजल्यावर त्यांचे शेटे मॅटर्निटी हॉस्पिटल व लॅप्रोस्कोपी सेंटर आहे. त्या स्त्रीरोग- प्रसूती, वंध्यत्व हायरिस्क प्रेग्नन्सी व गर्भसंस्कार तज्ज्ञ आहेत. पती डॉ. विशाल शेटे यांच्या बरोबरीने त्या प्रॅक्टिस करत आहेत.

करमाळा शहरात वंध्यत्वच्या रुग्णांसाठी सुसज्ज अँड्रोलॉजी, आययुआयलॅब व स्पर्म बँक असलेले हे एकमेव हॉस्पिटल असल्याचा त्यांचा दावा आहे. डॉ. प्रीती शेटे यांचे माहेर अहमदनगर तर सासर माहिजळगाव आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येथेच झाले. पुढील शिक्षण त्यांनी नगर व सोलापूर येथे घेतले. त्यांना महाराष्ट्र राज्य आरोग्य विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळालेले आहे. त्यांनी डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यांची परस्थिती तशी बेताचीच होती. कष्ट करून त्यांनी त्यांना शिकवले. त्यांचा दुधाचा व्यवसाय होता. त्यांच्या कुटुंबात सहा व्यक्ती होत्या. डॉ. शेटे यांना दोन बहिणी व एक भाऊ आहे. आई गृहिणी आहे.

डॉ. शेटे म्हणत आहेत मी डॉक्टर झाले नसते तर शिक्षण क्षेत्रातच गेले असते. डॉक्टर झाल्याचा मला जसा आंनद आहे तसा आई- वडिलांना ही आहे. डॉक्टरांकडे विविध प्रकारचे रुग्ण येत असतात. डॉक्टरांकडे ते एक दुःख घेऊन येत असतात. स्त्री रोग तज्ज्ञ यांच्याकडे रुग्ण येताना काहितरी भावना घेऊन आलेला असतो. येथे आपल्या समस्येचे निरसन होणार असे त्यांना वाटत असते. या विभागात वंध्यत्वचे रुग्णही येत असतात. याबाबत बोलताना डॉ. शेटे म्हणाल्या, विवाह होऊन १७- १८ वर्ष झाल्यानंतरही अपत्य प्राप्त झाले नाही तर पती- पत्नी व आजी- आजोबा यांच्यात निराशा असते. अशावेळी त्यांच्यावर उपचार करून गर्भधारणा होते. त्यानंतर रुग्ण व नातेवाईक यांच्या चेहऱ्यावर जे हास्य दिसते ते शब्दापलीकडेचे असते. यातून कामाचे समाधान मिळत असल्याचे त्या सांगत आहेत.
डॉ. शेटे म्हणत आहेत डॉक्टरांना देव मानले जाते पण डॉक्टर देव नाहीत. ते प्रत्येकवेळी प्रयत्न करत असतात. रुग्णाला सेवा देताना तो प्रमाणिकपणे काम करत असतो. नातेवाईकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. डॉक्टर हे १०० टक्के त्यांचे प्रमाणिकपणे काम करत असतात एखाद्यावेळी त्याचे प्रयत्न यशस्वी होतात. म्हणजे त्यांनी चुकीचे काम केले असे म्हणणे चुकीचे आहे.
शेटे हॉस्पिटल सामाजिक उपक्रमही राबवते. ‘बेटी बचाव बेटी पढाओ’, ‘अत्यल्प दरात सोनोग्राफी’, ‘संकल्प सुरक्षित मातृत्वाचा’, ‘मोफत रक्त लघवी तपासणी’ अशीही शिबिरे घेतली जातात. कन्या विद्यालयात मुलींना मार्गदर्शन व गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते. यापुढे तालुक्यातील प्रत्येक गावात महिलांच्या आरोग्याबाबत कार्यशाळा घेण्याचा रुग्णालयाचा मानस आहे.

रुग्णालयातील सुविधा…
डॉ. शेटे यांच्या दाव्यानुसार शेटे हॉस्पिटल हे करमाळा शहरात वंध्यत्वच्या रुग्णांसाठी सुसज्ज अँड्रोलॉजी, आययुआयलॅब व स्पर्म बँक असलेले हे एकमेव हॉस्पिटल आहे. येथे २४ तास नॉर्मल प्रसूतीची सेवेसाठी प्रसूतिगृह आहे. (जोखमीच्या गर्भवतीसाठी खास NST मशीनची सुविधा.), स्रियांच्या सर्व प्रकारचे ऑपरेशन, प्रसूती व स्त्रीरोग अतिदक्षता विभाग, वेदनाविरहित सुलभ प्रसूती सेवा, सोनाग्राफी सेंटर, सरकारमान्य कुटुंब नियोजन व गर्भपात केंद्र, कॅन्सर निदान व उपचार, अत्याधुनिक लॅप्रोस्कोपी, NDVH टाकाविरहित पिशवी काढण्याचे ऑपरेशन, वंध्यत्व निदान व उपचार, सुसज्ज अँड्रोलॉजी, आययुआय सेंटर, दुरणींद्वारे गर्भाशयाची पिशवी काढणे व इतर सर्व ऑपरेशन, स्पर्म बँकिंग सुविधा, नवविवाहित दांपत्य समुपदेशन केंद्र, रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रीयांसाठी तपासणी व समुपदेशन, २४ तास फार्मसी व लॅबोरेटरी सुविधा.