गौंडरे येथील धर्मवीर संभाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश

Success of students of Dharamveer Sambhaji Vidyalaya Goundre in sports competition

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील गौंडरे येथील धर्मवीर संभाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी युथ गेम्स असोसिएशन चॅम्पियनशिप महाराष्ट्र राज्य यांनी घेतलेल्या क्रीडा स्पर्धेत यश मिळवले आहे. या क्रीडा स्पर्धेत विद्यालयातील 17 वर्षाखालील कबड्डी स्पर्धेत मुलींनी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला व नॅशनलसाठी दिल्ली येथे निवड झाली आहे.

मुले कबड्डी स्पर्धेतून प्रथम व वैयक्तिक खेळामध्ये 17 वर्षाखालील वयोगटातून आदित्य नारायण नलबे 400 मीटधावण्यामध्ये तृतीय क्रमांक, विठ्ठल बिरुदेव कोपनर 100 मीटर धावण्यामध्ये महाराष्ट्रातून प्रथम, ओंकार ज्ञानदेव अंबारे भाला फेकमध्ये महाराष्ट्रातून प्रथम, तुषार धनाजी हनपुडे 200 मीटर धावण्यामध्ये महाराष्ट्रातून द्वितीय, मोनिका नागनाथ सपकाळ 100 मीटर धावण्यामध्ये महाराष्ट्रातून प्रथम, ऋतुजा संतोष हनपुडे 200 मीटर धावण्यामध्ये महाराष्ट्रातून प्रथम व रेणुका हरिचंद्र ननवरे 200 मीटर धावण्यामध्ये महाराष्ट्रातून द्वितीय या विद्यार्थ्यांचे क्रमांक आले आहेत.

त्यांना शिक्षक मुळीक, गिलबिले, काळे व बापू तांबोळी यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक बापू निळ, शाळेचे ज्येष्ठ शिक्षक कोळेकर, भोईटे, हनपूडे, जावळे, पुराने यांनी यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *