दुधाळ जनावरांचा पुरवठा करणाऱ्यांनी अर्ज करावेत

सोलापूर : 2022- 23 या पुरवठा वर्षासाठी विशेष घटक व नाविन्यपूर्ण योजना व इतर योजनेअंतर्गत दुधाळ जनावरे (गायी- म्हशींचा) पुरवठा करण्यासाठी पुरवठादारांच्या पॅनलमध्ये समाविष्ठ करण्यासंदर्भांत अर्ज मागवण्यात आले आहेत. 1 ऑगस्ट 2022 ते 31 जुलै 2023 या कालावधीसाठी दूधाळ जनावरे पुरवठा करावयाचा आहे. यासाठी एक पॅनल तयार करण्यात येणार असून इच्छुक पुरवठादारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पुरवठादारांकडून अटी व शर्तीची पूर्तता करून 30 दिवसांत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडे अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एन. ए. सोनवणे यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement

पुरवठादारसाठी अटी व शर्ती : १) पुरवठादार व्यक्ती/संस्था/ कंपनी/ फार्म यांच्याकडे कृषि उत्पन्न बाजार समितीचा जनावरांच्या बाजाराचा परवाना असणे अनिवार्य आहे. २) जनावरे खरेदी विक्रीचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. 3) पुरवठादारास सरकारने मंजूर केलेल्या दराप्रमाणे दुधाळ जनावरांचा पुरवठा करावा लागेल. तथापि, लाभार्थी शेतक-याच्या भागणीनुसार व खरेदी समितीने वाढीव किंमतीचे दुधाळ जनावर खरेदी करावयाचे ठरविल्यास अधिकची किंमत लाभार्थीकडून स्वतंत्ररित्या वसुल करावी लागेल.

4) पुरवठेदारांनी विहीत कालावधीत दुधाळ जनावरांचा (गायी-म्हशीचा पुरवठा करणे बंधनकारक राहील. 5) पुरवठेदाराने पैदाशीसाठी/ दुध उत्पादनासाठी अयोग्य जनावरे पुरवठा करण्याकरीता सादर करु नयेत. असे असल्याचे आढळून आल्यास, खरेदी समितीने अशी जनावरे खरेदी करण्याचे कटाक्षाने टाळावे. ६) पुरवठेदारांची दुधाळ जनावरांचा पुरवठा वारंवार अनियमितपणे केल्यास व नियम व अटीचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास सदरचा करार रद्द करण्यात येईल व त्याचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल.

७) एखाद्या विभागाच्या/जिल्ह्याच्या अधिकृत पुरवठेदारांनी पशुधनाचा विहित कालावधीत पुरवठा न केल्यास आणि अन्य विभागाचा / जिल्ह्याचा अधिकृत पुरवठेदार मंजूर दराने दुधाळ जनावरांचा (गायी-म्हशीचा पुरवठा करण्यास तयार असतील तर त्यांचेकडून खरेदी करण्यात येईल. याबाबत कोणतीही तक्रार करता येणार नाही. ८) प्रत्येक जिल्ह्यातील जनावरांच्या प्रचलीत बाजारातून लाभधारकाच्या पसंतीने तसेच खरेदी समितीच्या उपस्थितीमध्ये दुधाळ जनावरांची खरेदी करण्यात येईल.

९) पॅनलमध्ये समाविष्ट असलेल्या अथवा पॅनलमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात किंवा इतर कोणताही वाद निर्माण झाल्यास त्याचा निपटारा मा. प्रधान सचिव (पदुम), मंत्रालय, मुंबई यांचेकडे अपील करता येईल. १०.अर्जदाराने सन २०१८-१९, सन २०१९-२० आणि सन २०२०-२१ या कालावधीचे आयकर विवरण पत्र सादर करणे बंधनकारक राहील.

११) लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे वाटप करतांना पुरवतेदाराने स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक राहील. कोणत्याही प्रतिनिधीची नियुक्ती करता येणार नाही. १२) अर्जदाराने पुरवठादार असल्याचे तसेच यापूर्वी किमान ३ वर्षे अशा प्रकारच्या खरेदी विक्रीच्या अनुभवाचे प्रमाणपत्र सादर करावे. तसेच, मागील तीन वर्षामध्ये किती दुधाळ जनावरांची खरेदी केली याबाबतची कागदपत्रे सादर करावेत. त्याबाबत कृषि उत्पन्न बाजार समितीचे खरेदी विक्रीचे अधिकृत आकडे सादर करावेत. १३) दर वर्षी किमान २५ लाखाचा खरेदी विक्रीचा व्यवहार केलेला असल्याचा दाखला. १४) आवश्यकता पडल्यास इतर राज्यामधून दुधाळ जनावरे आणण्याची व्यवस्था पुरवठादारास करावी लागेल, जेणे करून पुरवठ्याची साखळी अबाधित राहील. त्याचा खर्च पुरवठादारांनी स्वतः करावा लागेल.

१५) निवड करण्यात आलेल्या पुरवठादाराने विहित कालावधीत दुधाळ जनावरे उपलब्ध करून न दिल्यास पुरवठा आदेश दिल्याच्या दिनांकापासून १५ दिवसानंतर पुरवठादारास करारनाम्यामध्ये विहित केल्याप्रमाणे दंड आकारण्यात येईल. १६) केंद्र / राज्यशासनाचे सर्व संविधानिक कर अदा करण्याची जबाबदारी पुरवठादाराची राहील. पुरवठादाराने दुधाळ जनावरांचा पुरवठा केल्यानंतर त्यांनी बाजार पावती किंवा देयक /Invoice/Bill हे Printed अधिकृत स्वरुपाचे असणे आवश्यक राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *