करमाळा तालुका शिक्षक पतसंस्थेवर ‘स्वाभिमानी’चे वर्चस्व

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी संस्थेच्या निवडणुकीत स्वाभिमानी शिक्षक पॅनलने वर्चस्व सिद्ध केले आहे. गुरुसेवा शिक्षक पॅनलला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. स्वाभिमानी व गुरुसेवा यांच्यात ही लढत झाली होती. स्वाभिमानी शिक्षक परिवाराने एकतर्फी विजयी मिळवला आहे. मतमोजणी होताच स्वाभिमानी पॅनलने फटाक्यांचीआतिषबाजी करत जल्लोष साजरा केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिलीप तिजोरे यांनी काम पाहिले.

स्वाभिमानी शिक्षक पॅनलचे अरुण चौगुले, तात्यासाहेब जाधव, प्रताप काळे, अजित कणसे, निशांत खारगे, पूनम जाधव, वैशाली महाजन, सतीश चिंदे, साईनाथ देवकर, आदिनाथ देवकते तर गुरुसेवा पॅनलचे हनुमंत सरडे विजयी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *