करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. 4) मतदान होत आहे. या मतदानाची प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली असून सर्व मतदान यंत्रणा मतदान केंद्रांवर दाखल झाली आहे. तहसीलदार समीर माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा दाखल झाली असून मतदानप्रक्रिया सुरळीत व्हावी म्हणून पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मानदर्शनाखाली पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.
Video : वारे यांच्या प्रयत्नाला यश; कामोणे तलावात कुकडीचे पाणी दाखल होताच पूजन
करमाळा तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये वांगी १, वांगी २, वांगी ३ व वांगी ४ व भिवरवाडी या नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये पहिल्यांदाच मतदान होत आहे. याशिवाय सातोली, बिटरगाव व आवाटी या ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया होत आहे.
Video : मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा मिळत असल्याने सैरभैर झालेल्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेचे भगवे उपरणे पांघरून सामंत यांच्या गाडीवर