Video : करमाळा पंचायत समितीच्या वतीने ‘टीचर टॉक’ उपक्रम

Teacher Talk activity on behalf of Karmala Panchayat Samiti

करमाळा (सोलापूर) :

Advertisement
Advertisement
करमाळा पंचायत समितीच्या वतीने Ted Talk च्या धर्तीवर Teachers Talk उपक्रम राबवण्यात येणार आहे. गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी ही माहिती दिली आहे. या उपक्रमात यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने पारितोषक दिले जाणार आहे. याबाबत तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक व प्राचार्य यांना पत्र देण्यात आले आहे.

गटविकास अधिकारी राऊत म्हणाले, दर महिन्यात शिक्षण परिषदेमध्ये १० ते २० मिनिटे Teachers Talk साठी राखून ठेवली जातील. यामध्ये पूर्व नोंदणी केलेल्या शिक्षकांनी नाविन्यपूर्ण संशोधन सादर करावयाचे आहे. शिक्षकांनी मांडलेले मुद्दे नाविन्यपूर्ण असणे आवश्यक आहे. के केंद्रातून दर महिन्यात शिक्षण परिषदेवेळी येणे आवश्यक आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रथम क्रमांक काढला जाईल. त्यात प्रथम क्रमांक आलेल्या शिक्षकांना यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने ३ हजार रुपये रोख व सन्मानपत्र दिले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

शिक्षण क्षेत्रातील भौतिक सुविधांसह गुणवत्ता वाढ व उत्पादक घटक उपक्रम या अनुषंगाने समग्रपणे विद्यार्थ्यांना व पालकांना यातून मार्गदर्शन मिळावे म्हणून हा उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी ३० विषय दिले आहेत, असेही गटविकास अधिकारी राऊत यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *