करमाळा शहरात वेताळ पेठमध्ये साधारण ५०० मीटरवर वेगवेगळ्या समाज बांधवांची श्रद्धास्थाने म्हणजे मंदिरे आहेत. हे सर्व बांधव एकमेकाच्या सण उत्सवात एकत्र येतात. त्यातच त्यांना माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी एक हक्काचे व्यासपीठ दिले आहे. त्या माध्यमातून ते विविध उपक्रम राबवतात. हे उपक्रम राबवणारे व्यासपीठ म्हणजे गजानन सोशल ऍण्ड स्पोर्ट क्लब! यामध्ये साधारण ४०० सदस्य आहेत. हे सदस्य एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्यामध्ये ते विविध उपक्रमही राबतात. तरुण, चिमुकले व महिलांचा यामध्ये सहभाग असावा यासाठीही त्यांचा प्रयत्न असतो.
जैन मंदिर, मशीद, श्रीकृष्ण मंदिर, वेताळ मंदिर, राम मंदिर, शितलादेवी मंदिर ही श्रद्धास्थाने आहेत. वेताळ पेठ संपताच किल्ला वेशीत हनुमान मंदिर, शनी मंदिर आहे. गणेशोत्सवात करमाळा शहरातून विसर्जन मिरवणूका येथून जातात. तेव्हा त्यांच्यावर मशिदीवरून पुष्पवृष्टी केली जाते. या पेठेत सर्व धर्म समभावाचे दर्शन होते. गजानन सोशल स्पोर्ट क्लबमध्येही सर्व धर्माचे सदस्य आहेत.
प्रत्येकजण जबाबदारीने येथे काम करतो. फक्त उत्सवाच्या काळातच नाही तर वर्षभर या मंडळाकडून विविध उपक्रम राबवले जातात. या सोशल क्लबने दिव्यांग व वृद्धांना संजय गांधी निराधार योजनेसाठी मदत केली. याशिवाय त्यांच्या अडचणी सोडवण्यावर भर देण्यात आला. कोरोना काळात मंडळाने रुग्णालयामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून तेथे जाऊन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मदत केली.
सामाजिक उपक्रम राबवताना रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, गणेश जयंतीच्या निमित्ताने सुमारे ६००० नागरिकांना महाप्रसाद वाटप केले जाते. यामध्ये सर्वसदस्यांचा सहभाग असतो. हे करताना मंडळातील सदस्य स्वतः झोकून देऊन काम करतात. गणेशोत्सवात व्यसनमुक्तीसाठी जनजगृती, नागरिकांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. बेटी बचाओ बेटी पढाओ, पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण, दुष्काळ निवारण्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा यासाठी काम केले जाते. याबरोबर तरुणांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन दिले जाते. क्रिकेटच्या माध्यमातून या मंडळाने अनेक पारितोषके मिळवली आहेत.
मंडळाची स्थापना…
१४ जानेवारी २००० रोजी ७ ते १८ सदस्यांनी माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांच्या मार्दर्शनाखाली एकत्र येऊन गजानन सोशल ऍण्ड स्पोर्टस क्लब स्थापन केले. त्यानंतर त्यांनी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ग्रुपचे ज्येष्ठ मार्गदर्शक कै. नारायण ढाळे यांनी त्यांना पाठबळ दिले. पहिल्यावर्षी मंडळाने अतिशय सध्या पद्धतीने हात गाड्यावर दोन साउंड लावून मिरवणूक काढली. विशेष बाब म्हणजे तो हात गाडा ढकलण्यासाठी मार्दर्शक कै. ढाळे हे स्वतः होते. त्यांच्या मार्दर्शनाखाली हे मंडळ वाटचाल करत आहे. तोच वारसा प्रशांत ढाळे यांनी सक्षमपणे चालवला आहे. या मंडळाने २०१६ मध्ये राजमुद्रा ग्रुपच्या ढोल- ताशा पथक आणत ३०० ड्रेस कोडमध्ये श्री गणेशाच्या विसर्जनाची सवाद्य मिरवणूक काढली होती.
गणेशोत्सवातील पदाधिकारी व सदस्य
अध्यक्ष : अल्ताफ दारूवाले, उपाध्यक्ष संतोष लोकरे, योगेश सोरटे, सचिव आशिष मंदलेचा, खजिनदार संतोष व्यंगलम, मिरवणूक प्रमुख : निखिल बनकर. सदस्य प्रशांत ढाळे, समीर बागवान, चेतन ढाळे, अक्षय ढाळे, कुणाल ढाळे, अल्ताफ दारूवाले, मुदोतसर दारूवाले, डॉ. गजेंद्र विभुते, इरशाद भाई शिकलकर, भावेश देवी, आरशद शिकलकर, प्रीतमशेठ बलदोटा, सुमित ढाळे, विशाल ढाळे, प्रशांत राजपुरे, शेखर गायकवाड, नागेश लोकरे, शुभम बोधे, योगेशशेट सोरटे, चिन्मय मोरे, रोहिदास आलाट, जॉनटी पठाण, संतोष मंडलिक तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक विकासशेठ ढाळे, प्रदिपकाका ढाळे.