प्रशासनाने गोर गरिबांना मोफत तिरंगा द्यावा : ऍड. विघ्ने

The administration should give free tricolor to poor people

केत्तूर (अभय माने) : देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गोरगरीब व मोलमजूरी करणाऱ्या नागरिकांना आपल्या देशाबद्दल सार्थ अभिमान आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेला प्रशासनाने तिरंगा मोफत द्यावा, अशी मागणी केत्तूरचे माजी सरपंच अॅड. अजित विघ्ने यांनी केली आहे.

भारत सरकारने ‘हर घर तिरंगा’ ही संकल्पना राबविली परंतु वरचेवर वाढणाऱ्या महागाईने समस्त जनता त्रस्त झाली आहे. तर नागरिक आर्थिक दृष्ट्या कमकुवत होत आहेत. त्यामुळे तिरंगा व त्यासाठी लागणारी सामग्री प्रशासनाने मोफत द्यावी, अशी मागणी ऍड. विघ्ने यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *