‘पुढच्या वर्षी डबल तयारीत येणार’ करमाळा शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत वेधले बॅनरने लक्ष

करमाळा (सोलापूर) : काल (शुक्रवारी) सर्वत्र लढाक्या श्री गणेशाचे विसर्जन झाले. करमाळ्यातही गणेश भक्तांनी वाजत गाजत गणरायाला निरोप दिला. यासाठी वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. त्यात गजराज मंडळाच्या मिरवणुकीत लावलेल्याएका बॅनरने गणेशभक्तांचे लक्ष वेधले आहे. ‘पुढच्या वर्षी डबल तयारीत येणार’, असा मजकूर असलेला हा बॅनर होता.
Video : मुलं दत्तक घेऊन जपली सामाजिक बांधिलकी! १९६५ पासून एकदाही अध्यक्ष न नेमलेले करमाळा शहरात गणेशोत्सव मंडळ

करमाळा शहरातील मेन रोडवर असलेला गजराज तरुण मंडळाची एक वेगळी परंपरा आहे. येथील सर्व सदस्य मोठ्या भक्तिभावाने या गणेशोत्सवात सहभागी होतात. कोरोनंतर यावर्षी गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रत्येक मंडळाचे कार्यकर्ते उत्सहात सहभागी झाले होते. एकापाठोपाठ एक अशा अतिशय शिस्तीत या मिरवणुका जात होत्या. त्यातच गजराज मित्र मंडळाचीही मिरवणूक होती. सायंकाळी मिरवणुकीत पावसाने हजेरी लावली होती. त्यातही उत्साह कायम होता. गजराज तरुण मंडळाच्या मिरवणुकीमध्ये शेवटच्या ट्रेलरवर ‘पुढच्या वर्षी डबल तयारीत येणार’ असा उल्लेख असलेला बॅनर होता.
Video : तरुणाई थिरकली! करमाळा @8; गणेश विसर्जन मिरवणुकीतील पाच वैशिष्ट्य

कोरोनानंतर यंदा दोन वर्षांनी मोठ्या उत्साहात श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या. तब्बल आठ तास या मिरवणुका चालल्या. करमाळ्यातील १२५ वर्षाची परंपरा असलेला मानाचा पहिला श्री देवीचामाळ येथील राजेराव रंभा तरुण मंडळाचा गणपती मिरवणूक निघाल्यानंतर मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. पहिल्या गणपती पाठोपाठ दुसरा मानाचा किल्ला वेस येथील लोकप्रिय हनुमान तरुण मंडळाचा गणपती निघाला त्यानंतर मानाचा मानाचा तिसरा गणपती लोकमान्य टिळक तरुण मंडळाची गणेश विसर्जन मिरवणुका निघाली. रात्री ११.४० वाजता फुलसौंदर चौक येथे शेवटची नवजवान सुतार तालीम तरुण मंडळाचा शेवटचा गणपती विसर्जन मिरवणूक गेली. त्यानंतर जय महाराष्ट्र चौकात ११.५६ वाजता पोलिसांनी डीजे बंद करायला सांगितले. त्यानंतर सुभाष चौक येथे मध्यरात्री १२.०५ वाजता (००.०५) सर्व बाजुंनी पोलिसांनी एकत्र येऊन सर्व ठिकाणचे डीजे बंद केले त्यानंतर वाद्य बंद करून श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुका पुढे मार्गस्थ झाल्या.

संपादन : अशोक मुरूमकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *