मंगळवेढा येथे उत्कृष्ट काम करणारे गुंजवटे घेतायेत आजच करमाळ्याचा चार्ज

The charge of Karmala can be heard today by doing excellent work in Mangalvedha

करमाळा (सोलापूर) : ज्योतीराम गुंजवटे यांची करमाळा येथे पोलिस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे. मंगळवेढा येथे त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले आहे. त्यांच्या बदलीचा आदेश शुक्रवारी (ता. २६) रात्री झाला आहे. करमाळ्याचे सूर्यकांत कोकणे यांच्या जागी ते येत आहेत. आज (शनिवारी) ते चार्ज घेत आहेत. मंगळवेढा येथे त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे काम केले होते त्यानंतर ते करमाळा येथे बदलीने येत आहेत. कोकणे यांनीही करमाळ्यात अतिशय चांगले काम केले आहे. पोलिस वसाहत, करमाळ्यातील नवीन पोलिस ठाणे व पोलिस वसाहत येथे नवीन उभारण्यात आलेला हॉल अशी कामे त्यांची चर्चेत आहेत.

कोरोनाच्या काळात त्यांनी उत्कृष्टपणे काम केले आहे. मंगळवेढा तालुक्याच्या पोलिस ठाण्यात ११ ते १२ वर्षात पूर्ण काळ कामकाज पाहिलेले गुंजवटे हे एकमेव पोलिस निरीक्षक आहेत. त्यांनी अनेक फरार असलेले संशयित आरोपी पकडले आहेत. मंगळवेढा येथे गुंजवटे यांनी चार्ज स्वीकारण्याआधी दोन वर्षाचा कार्यकाळ कोणीही पूर्ण केला नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून त्यांनी कामकाज केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *