करमाळा (सोलापूर) : जिद्द आणि चिकाटी असेल तर तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही याचे उदाहरण म्हणजे स्त्रीरोग, प्रसूती व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. अफ्रिन समीर बागवान! आर्थिक परिस्थितीचे कारण न करता त्यांनी यश मिळवले आहे. भाजीपाला विक्रेत्याची मुलगी ते करमाळ्यातील नामवंत डॉक्टर असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास आहे. प्राथमिक शिक्षणापासूनच त्या अभ्यासात हुशार होत्या. दहावी आणि बारावीमध्ये त्या तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या. घरच्या परस्थितीला मागे टाकत त्यांच्या यशाचा आलेख कायम वर चढत राहिला आणि त्या वैद्यकीय क्षेत्रात आल्या. त्यांचे करमाळा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात हॉस्पिटल आहे.
करमाळा शहरातील भाजी मंडई जवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ‘आरोग्य प्रत्येकासाठी… प्रत्येकाच्या आरोग्यासाठी…’ हे ब्रीद वाक्य असलेल्या बागवान हॉस्पिटल व प्रसूतिगृह येथे डॉ. अफ्रिन समीर बागवान या कार्यरत आहेत. जनरल फिजिशियन व सर्जन डॉ. सादिक र. बागवान, जनरल फिजिशयन व होमीओपॅथिक तज्ज्ञ डॉ. समीर र. बागवान यांचे हे हॉस्पिटल आहे. डॉ. अफ्रिन बागवान यांचे MBBS, DGO शिक्षण झाले आहे.
डॉ. अफ्रिन बागवान यांचे माहेर व सासर करमाळाच आहे. त्यांचे वडील बटाट्याचे विक्रेते. घरची परिस्थिती तशी बेताचीच. अशा स्थितीत देखील त्यांनी मुलांना शिकवले. डॉ. अफ्रिन यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण करमाळ्यातच महात्मा गांधी विद्यालयात झाले. अगदी लहानपणासूनच आपण डॉक्टर व्हावे असे त्यांना वाटत होते. आणि तसा त्यांनी प्रयत्न केला आणि यश आले. डॉक्टर झाले नसते तर शिक्षण क्षेत्रात गेले असते असे त्या सांगत आहेत.
डॉक्टर हे रुग्णांचे सेवा करण्याचे माध्यम आहे. तसं शिक्षक हे एक पिढी तयार करण्याचे माध्यम आहे त्यामुळे त्या क्षेत्रातही मला काम करायला आवडले असते असे त्या सांगत आहेत. वैद्यकीय शिक्षण घेतानाही गुणवतेमुळे त्यांचा शासकीय महाविद्यालयात क्रमांक लागला. त्यांनी पुणे ससुन रुग्णालयात शिक्षण घेतले. त्यांनी करमाळा उपजिल्हा रुग्णालयातही काही दिवस सेवा केली.
मुस्लिम समाजात मुलींच्या शिक्षणाला तसे फार महत्व दिले जात नाही. इतर समजातही अपवाद सोडले तर मुलींच्या शिक्षणाला फार महत्व दिले जात नाही. डॉ. आफ्रिन या शिक्षण घेत होत्या तेव्हा त्यांच्या वडिलांनी कोण काय म्हणेल याकडेनंतर दुर्लक्ष केले आणि शिक्षण पूर्ण करण्यास मदत केली. सुरुवातीला त्यांचाही विरोध होता. मात्र नंतर त्यांची समजूत घालण्यात आली. आणि शिक्षण पूर्ण केले. फक्त माझेच नाही तर दोन भवांचेही शिक्षण पूर्ण केले. एक भाऊ मुंबईत एका नामांकित रुग्णालयात आहे. तर दूसरा भाऊ मेडिकल चालवतो, असे डॉ. बागवान यांनी सांगितले. केवळ समाजाची सेवा करता यावी म्हणून मी डॉक्टर झाले असल्याचेही त्या म्हणत आहेत.
कोणत्याही क्षेत्रात काम करताना प्रमाणिकपणे काम करा व आहे त्यात समाधान मानून जे मिळाले आहे स्वीकारा. आणि जे मिळवायचे आहे त्यासाठी प्रमाणिकपणे प्रयत्न करा. आणि त्यातून यश आले नाही तर निराश न होता मार्ग बदला, असा सल्ला डॉ. आफ्रिन बागवान यांनी दिला आहे. कोणतेच क्षेत्र पहिले आणि शेवटचे नसते, असेही त्या म्हणाल्या आहेत.

या आहेत सुविधा…
बागवान हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी सुविधा, प्रसूतिपूर्व वप्रसुती पश्चात तपासणी, सुलभ व वेदनाविरहित उपचार, स्रीरोग चिकित्सा व उपचार, वंध्यत्व चिकित्सा व उपचार, कर्करोग निदान व उपचार, एनसीटी मशिनची सोय, सुसज्ज प्रसूतिगृह, अत्याधुनिक सुसज्ज ऑपरेशन थिएटर, गर्भपात विषयक सल्ला व उपचार, बिन टाक्याचे कुटुंबनियोजन शस्र्क्रिया, कुटुंब नियोजन शस्र्क्रिया उलटविणे, दुर्बिणीद्वारे शस्र्क्रिया, सर्व प्रकारच्या शस्र्क्रियेची सोय, ईसीजी, बालरोग निदान व उपचार, जनरल तपासणी व उपचार, होमिओपॅथिक उपचार, सरकारमान्य कुटुंब नियोजन व गर्भपात केंद्र.