भक्ती रथात निघाला ‘करमाळ्याचा राजा’

करमाळा (सोलापूर) : शहरातील राशीन पेठ येथील करमाळ्याचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक यंदा ‘भक्ती रथा’तून काढण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर व संत तुकोबाराय यांची प्रतिकृती साकारून रथ तयार करण्यात आला आहे. या रथात श्री विराजमान झाले आहेत. मोठ्या उत्साहामध्ये ही मिरवणूक काढण्यात आली आहे. डीजे व बँजोच्या तालात ही मिरवणूक काढण्यात आली आहे.

करमाळाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राशन पेठ तरुण मंडळ गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूकची प्रचंड मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करत सुरुवात झाली. सांगलीतील असलेल्या आकाश बँजो पार्टीने वाजवलेला गणपती राया पडतो मी पाया या गाण्याच्या चालीवर भक्तांनी मोठा जल्लोष करत नाचत आपला आनंद व्यक्त आरतीच्या सुरवातीला झालेली गुलाबाची उधळण झाली.

‘फंड गल्लीचा राजा’ची लेझीम खेळत मिरवणूक
फंड गल्ली येथील लोकमान्य टिळक तरुण मंडळाची डोल ताशाच्या गजरात लेझीम खेळात पारंपरिक पद्धतीने श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन लेझीम खेळण्याचा आनंद घेतला. ‘फंड गल्लीचा राजा’ असा उल्लेख असलेले टी शर्ट गणेशभक्तांचे लक्ष वेधत होते. ५.४५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर वाजत गाजत श्रींची मिरवणूक आली होती.

१२५ वर्षाची परंपरा असलेल्या मनाच्या बाप्पाची मिरवणूक
करमाळा शहरातील गणेशविसर्जन मिरवणुका निघाल्या आहेत. १२५ वर्षांपासून पहिला मनाचा समजल्या जाणाऱ्या श्रीमंत राजेराव रंभा तरुण मंडळ श्री देवीचा माळ येथील बाप्पाची मिरवणूक वाजत गाजत निघाली आहे. हत्तीची प्रतिकृती करण्यात आली असून त्यावर बाप्पा विराजमान झाले आहेत. डीजेच्या तालात गुलालाची उधळण करत श्री गणेशाच्या विसर्जनासाठी ही मिरवणूक निघाली आहे. दत्त पेठ, राशीन पेठ मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर ४.४० वाजता ही मिरवणूक आली.

श्री देवीचामाळ येथील पहिल्या मनाच्या गणेशाची मिरवणूक निघाल्यानंतर प्रमुख मंडळाच्या मिरवणूक काढल्या जातात ही परंपरा आहे. करमाळा कोरोना नंतर दोन वर्षांनी यंदा मोठ्या जल्लोषात मिरवणूका निघत आहेत. यासाठी नगरपालिकेने जयप्रकाश नारायण टाऊन हॉल येथे कृत्रिम तलाव केलेला आहे. पोलिस निरिक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.

करमाळा शहरात गणेशोत्सवानिमित्त मंडळांनी देखावे सादर केले धार्मिक व सामाजिक विषयांवर देखावे सादर करण्यावर भर देण्यात आला होता. याशिवाय सजीव देखाव्यांच्या माध्यमातून जवलंत विषयांवर मंडळांनी भाष्य केले. दत्त पेठ तरुण मंडळाने ‘सोशल मीडियाचे फायदे व तोटे’ सजीव देखाव्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला तर राशीन पेठ तरुण मंडळानेही सजीव देखावा सादर स्वछता या विषयवार भाष्य केले. कानाड गल्लीतील महर्षी वाल्मिकी मित्र मंडळाने कोरोनावर सजीव देखावा सादर केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *