करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील धायखिंडी येथील एकाची मेन रस्त्यावरील शंकरराव मोहिते पाटील बॅंकेसमोरून दुचाकी चोरीला गेली आहे. यामध्ये अण्णासाहेब पांडुरंग मोटे (वय ५५) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी मोटे हे करमाळा शहरातील एका शेती औषधे व बी- बियाणे दुकानात काम करतात. कामावर असताना त्यांनी बँकेसमोर मोटारसायकल उभा केली होती.
२३ तारखेला सकाळी त्यांनी मोटारसायकल उभा केली होती. त्यानंतर ते कामावर गेले. मात्र जाताना पाहिले तेव्हा त्यांना मोटारसायकल दिसून आली नाही. याप्रकरणात अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सुमारे १५ हजार किंमतीची ही मोटारसायकल असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.


