करमाळा (सोलापूर) : माढा तालुक्यातील टेंभूर्णी येथील शिव विचार प्रतिष्ठानच्या वतीने करमाळा तालुक्यातील ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ. ॲड. बाबुराव हिरडे यांना ‘सामाजिक पुरस्कार’ दिला. आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
टेंभुर्णी येथील ‘शिवविचार प्रतिष्ठानच्या’ पहिल्या वर्धापनदिना निमित्त आज (बुधवारी) दसरा मेळावी विविध पुरस्काराचे वितरण झाले आहे. या प्रतिष्टानकडून विविध क्षेत्रातील पाच व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
यामध्ये जिजाऊ सामाजिक पुरस्कार’ स्मिता पाटील, ‘सामाजिक पुरस्कार’ डॉ. ॲड. बाबूराव हिरडे, ‘साहित्यिक पुरस्कार’ प्रा. संजय साठे, ‘कृषी भूषण पुरस्कार’ सोमनाथ हुलगे व ‘व्यसनमुक्त पुरस्कार’ बाळासाहेब माने यांना देण्यात आला आहे.