करमाळा (सोलापूर) : आजादी का अमृत महोत्सव निमीत्त सरकारकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यातुनच करमाळा तहसील कार्यालयाच्या वतीने तालुक्याचा ऐतिहासिक वारसा सांगणार्या 9 ठिकाणांचे फलक लावण्यात आले आहे. हे फलक सर्वांचे लक्ष वेधत आहे.
करमाळा तालुक्याचा ऐतिहासिक वारसा सांगणार्या ठिकाणांमध्ये ’96 पायरीची विहीर’, ‘श्री कमलाभवानी मंदिर’, ‘करमाळा येथील भुईकोट किल्ला’, ‘करमाळा येथील श्री मारुती मंदीर’, ‘करमाळा येथील श्री खोलेश्वर मंदीर’, ‘चिखलठाण येथील कोटलिंग देवस्थान’, ‘केम येथील श्री उत्तरेश्वर देवस्थान’, ‘संगोबा येथील आदिनाथ महाराज देवस्थान’ व ‘पोथरे येथील श्री शनैश्वर देवस्थान’ या ठिकाणांचा फलक लावण्यात आला आहे.