करमाळा (सोलापूर) : हालगीच्या कडकडाटात मराठी चित्रपटसृष्टीला नवी दिशा देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे यशकल्याणी सेवाभवन येथे स्वागत करण्यात आले.
ग्रामसुधार समीती व यशकल्याणी परिवारच्या वतीने साहित्यिक प्रा. डॉ. राजेंद्र दास यांना ‘करमाळा भुषण’ पुरस्कार देण्यात येत आहे. दिग्दर्शक नागरज मंजुळे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील आहेत. विचारमंचावर ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष अॅड. बाबूराव हिरडे, पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे उपस्थित आहेत. सुत्रसंचालन डॉ. सुनिता दोशी या करत आहेत. प्रास्ताविक अॅड. हिरडे यांनी केले.
(कार्यक्रम अजून सुरु आहे.)