बागल कार्यालयासमोर गुलालाची उधळण! वडशीवणे, वांगी 4 ग्रामपंचायतीवर वर्चस्व

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वडशिवणे व वांगी 4 व भिवरवाडी ग्रामपंचायतीवर बागल गाटाने एक हाती सत्ता मिळवली आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाक्याची अतिशबाजी केली. बागल कार्यालय येथे बागल गटाचे नेते दिग्वीजय बागल हेही या जल्लोषात सहभागी झाले.

करमाळा तालुक्यातील वडशिवने ग्रामपंचायतीवर बागल गटाचे वर्चस्व राहिले आहे. येथे जगतापगटविरुद्ध बागल गट यांच्यात लढत झाली. नऊ जागांसाठी येथे निवडणूक लागली होती. यामध्ये बागल गटाला सात तर जगताप गटाला दोन जागा मिळाल्या आहेत.

वडशीवणे येथे बागल गटाकडून राजश्री जगदाळे, शारदा साळुंखे, उषा जगदाळे, कमल वाघमारे, अमोल उघडे, विशाल जगदाळे, रुपाली देवकर हे विजयी झाले आहेत. तर जगताप गटाचे रत्नाकर कदम व प्रसाद पाटक हे दोघेही 1 मताने विजयी झाले आहेत.

वांगी नंबर 4 व भिवरवाडी ग्रामपंचायतीमध्ये बागल गटाचे वर्चस्व राहीले आहे. येथे बागल गटाचे डॉ. भाऊसाहेब शेळके, परशुराम जाधव, अमरसिह अरकीले, गायत्री शेळके, धनसिंग शेटे व शिंदे गटाचे आबासाहे राखुंडे व सविता सुळ हे विजयी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *