घाबरू नका पण काळजी आवश्यक! करमाळा तालुक्यातील ‘लंपी’चे रिपोर्ट निगेटिव्ह

The report of Lumpi in Karmala taluka is negative

करमाळा (सोलापूर) : जनावरांमधील लंपी आजारामुळे पशुपालक सध्या चिंतेत आहेत. त्यातूनच करमाळा तालुक्यातील संशयित जनावरांच्या रक्ताचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र याचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे कोणत्याही पशुपालकाने घाबरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात लंपी आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदार संचाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार करमाळा तहसील येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी मनोज राऊत, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यावेळी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये करमाळ्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. लक्षणे आढळलेल्या जनावरांच्या रक्ताचे नमुने विभागीय रोग अन्वेषण निदान प्रयोग शाळा औंध- पुणे ६७ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता पशुधनांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी चिवटे यांनी शेतकऱ्यांकडून आलेल्या तक्रारी प्रशासनापुढे मांडल्या. गोठ्यामध्ये व आजूबाजूस स्वच्छता ठेवावी व बाहेर तालुक्यातून पशुंची खरेदी करण्याचे टाळावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. डॉ. कांबळे, भाजपाचे तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, पांडेचे उपसरपंच नितीन निकम, विशाल साळुंखे, विनोद इंदलकर व पशुधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *